मनसे उमेदवार संजय तुरडेंवर प्राणघातक हल्ला

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 01:42 PM IST

मनसे उमेदवार संजय तुरडेंवर प्राणघातक हल्ला

turade

24 फेब्रुवारी : कालिना येथील वॉर्ड क्रमांक 166 इथून निवडून आलेले मनसेचे उमेदवार संजय रामचंद्र तुरडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तुरडेंनी केलाय. महापालिका निवडणुकीत तुरडे निवडून आल्याचा राग आल्याने त्यांच्यावर लोखंडी सळई आणि तलवारीने सपासप वार करून पळ काढला.

स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं तुरडे यांना वेळीच रूग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण बचावले. तुरडे यांच्या डाव्या पायाला आणि गुडघ्याला फ्रॅक्चर झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...