23 फेब्रुवारी : आज सकाळी निकालांचे कल येण्यास सुरू झाले तेव्हा खरंतर मुंबईत शिवसेना बऱ्यापैकी आघाडीवर होती पण नंतर भाजपने जोरदार कमबॅक करत शिवसेनेची चांगलीच दमछाक केली. त्यामुळे राजकारणात सत्ता मिळवायची वेळ आली की गोष्टी काही तासात कशा जुन्या होतात हे सेना नेत्यांच्या आज दिवसभरातल्या वक्तव्यावरून सहज लक्षात येईल.राजकारण किती तासात किती मिनिटात बदलतं ह्याचं उत्तम उदाहारण म्हणजे सेनेच्या जोशी राऊत ह्या नेत्यांची वक्तव्य. मुंबईचा निकाल लागायला सुरुवात झाली आणि पहिल्या दीड दोन तासात शिवसेनेनं नव्वदी गाठली. तो निकाल नाही तर आघाडी होती. संजय राऊतांना घाई झाली असावी. त्यांनी माध्यमांकडे थेट वक्तव्य केलं.संजय राऊतांनीच भाजपचे शंभर बाप आणि साप काढले होते. निकाल जसाही पुढं सरकत गेला तशी भाजपनं हळूहळू कासव सशाच्या गोष्टीसारखं शर्यत बरोबरीत आणली. मातोश्रीच्या आणि सेना भवनच्यापुढचा जल्लोष हळूहळू फिक्का व्हायला लागला. शिवसेनेला अवघ्या तीन जागा जास्त मिळाल्या. सत्ता हवी तर भाजपशिवाय पर्याय राहीला नाही. शाहीस्तेखानाची बोटं छाटायला निघालेली शिवसेना चक्क युती न करणं ही तर जुनी गोष्ट म्हणायला लागली.लोकं हुशार असतात. त्यांना अगोदरच अंदाज आलेला असतो. त्यामुळेच की काय भाजप आणि सेना आता सत्तेसाठी एकत्र येण्यासाठी माहौल तयार करतायत. विखारी भाषा वापरणारे दोन्ही बाजुकडचे नेते मवाळ होताना दिसतायत. खुद्द किरीट सोमय्याही त्यात आहेत. त्यामुळे पारदर्शी, माफिया असं सगळं मागं पडून आता सत्ता एकं सत्ता आणि त्यासाठी सर्वकाही असंच दिसतंय..बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv