'बिग बाॅस'ची लढाई ; कोणं जिंकलं, कोण हरलं ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2017 11:38 PM IST

'बिग बाॅस'ची लढाई ; कोणं जिंकलं, कोण हरलं ?

big_fight423 फेब्रुवारी : मनपा आणि झेडपी इलेक्शनमध्ये सर्वच पक्षांच्या स्टार कॅम्पेनरची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषतः मुंबईत उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई होती. ही लढाई उद्धव ठाकरेंनी अर्थातच जिंकलीय, पण देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई वगळता उर्वरित राज्याला भाजपला भरघोस यश मिळवून दिलंय. पाहुयात कुठला नेता राजकीय लढाईत जिंकला आणि हरला...

मुंबईत उद्धव ठाकरे जिंकले, पण !

10 मनपा आणि 25 झेडपींच्या राजकीय दंगली सर्वच पक्षांच्या प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली होती....विशेष मुंबईत तर उद्धव ठाकरेंसाठी तर ही लढाई शब्दशः करो वा मरोची स्थिती होती. पण त्यांनी आपली सर्व ताकद फक्त मुंबईतच पणाला लावून हे राजकीय युद्ध नक्कीच मोठ्या फरकाने जिंकलंय असंच बीएमसीच्या निकालानंतर म्हणावं लागेल.. बघुयात आता सत्तास्थापनेत उद्धव ठाकरे भाजपला पुन्हा सोबत घेतात की बीएमसीला भाजप मुक्त करतात....? दरम्यान, उर्वरित महाष्ट्रात मात्र. शिवसेनेला फारसं यश मिळालेलं दिसत नाही. अर्थात उद्धव ठाकरेंनी ग्रामीण भागात फारसा जोर लावलाच नव्हता म्हणा....

महाराष्ट्राचे मोदी, देवेंद्र फडणवीस !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत हरले असले तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र, त्यांनी भाजपला अतिशय चांगलं यश मिळवून दिलंय. विशेषतः पुण्यातलं भाजपचं यश निश्चितच डोळ्यात भरणारं आहे..

Loading...

या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवारांना भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत शब्दशः धोबीपछाड दिलाय. अर्थात झेडपीतले काही बालेकिल्ले राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी झालीय...एकूणच कायतर पुणे- पिंपरी चिंचवडच्या लढाईत अजित पवार हरल्यात जमा आहेत.

राज ठाकरे हरले

नाशिकमधली सत्ता राखण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर होतं....पण त्यात सपशेल हरलेत...मुंबई आणि पुण्यातही मनसेची मोठी पिछेहाट झालीय. एकूणच प्रचारसभांमधून विकासकामांचं प्रेझेन्टेशन करूनही राज ठाकरे या लढाईत हरलेत असंच म्हणावं लागेल...

अशोक चव्हाणांनी काँग्रेसची इज्जत वाचवली !

महापालिकांमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी समाधानकारक नसली तरी झेडपीत मात्र, काँग्रेसनेत्यांनी आपआपले बालेकिल्ले राखण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय. एकूणच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या राजकीय दंगलीत पक्षाची इज्जत वाचवण्यात नक्कीच यशस्वी झालेत असंच म्हणावं लागेल.

संजय निरुपम अखेर हरले

मुंबईत काँग्रेसच्या प्रचाराची सर्व धुरा शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे होती.पण निवडणुकीपुर्वीच्या पक्षांतर्गंत लाथाळ्या लक्षात घेता काँग्रेसची पिछेहाट होणारच होती. आणि झालंही तसंच...संजय निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईत सपशेल हार पत्करावी लागली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामाही दिला.आणि भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले.बघुयात आतातरी मुंबई काँग्रेसमधले मतभेद मिटतात की नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...