मुंबईकरांनी खरंच राजाला 'सात' दिले !

मुंबईकरांनी खरंच राजाला 'सात' दिले !

  • Share this:

raj_thackery_new23 फेब्रुवारी : 'एकटा पडलाय राजा...राजाला साथ द्या' असं गीत गात मनसेचं इंजिन मुंबईकरांच्या दारात फिरलं खरं पण मुंबईकरांनीही राजाला 'सात' देत मी इथला 'मतदारराजा' असल्याचं ठणकावून सांगितलं.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयशानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला जिंवत ठेवण्यासाठी उडी घेतली. मुलगा अमित ठाकरेची प्रकृती खराब असल्यामुळे राज ठाकरे यांनी प्रचाराला उशिराच सुरुवात केली. आधीच पक्षाची पडझड झाल्यामुळे मनसेचं काय होईल असा प्रश्न टीकाकारांनाच नाहीतर पक्षालाही सतावत होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला. टाळीसाठी बाळा नांदगावकर यांनी 'मातोश्री'ही गाठली. पण उद्धव ठाकरेंनी काही टाळी दिली नाही. एवढंच नाहीतर खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सात फोनही केले. पण युती न करण्याचा पवित्रा घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी टाळी झिडकारली.

त्यानंतर  'एकटा पडलाय राजा...राजाला साथ द्या' असं गीत गात मनसेच्या निवडणुकीला सुरुवात झाली. मागील महापालिका निवडणुकीत मतदाराजाने मनसेला 28 जागा दिल्या. पण, गेल्या 5 वर्षात कोणतेच जागेला जागं न राहिल्यामुळे मतदाराजाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इंजिनला यार्डाचा रस्ता दाखवला. पक्ष टिकवण्यासाठी राज ठाकरे यांनी पूर्ण ताकदपणाला लावली. नाशिकच्या विकास कामाचं प्रेझेंटेशनच त्यांनी भर सभेत दाखवलं. पण, ज्या नाशिकच्या कामाचा दाखला राज देत होते त्या नाशिककरांनी मनसे बाहेरचा रस्ता दाखवला. नाशकात कशाबशा 5 जागा जिंकता आल्या. आणि होमग्राऊंड असलेल्या मुंबईत फक्त सात जागा मिळाल्यात. त्यामुळे राजाला खरंच मुंबईकरांनी सात दिली असं आता उपहासात्मकपणे म्हणावं लागतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे मुंबईकरांना 'मला तुमच्याशी बोलायचंय' असं निमंत्रण देता का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 23, 2017, 9:36 PM IST

ताज्या बातम्या