23 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत एवढी ताकद लावून भाजपला अवघ्या 82 जागाच मिळाल्या हे भाजपचं यश कसं म्हणता येईल असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
तसंच महापौर हा सेनेचाच होईल एवढंच नाहीतर मुख्यमंत्रीही सेनाच ठरवले तोपर्यंत घाई करू नका अशी सावध प्रतिक्रिया दिली.
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या यशावर टीकेचे बाण सोडले. मुंबईत शेवटी शिवसेनाच एक नंबरचा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळत अवघ्या पाच मिनिटांत पत्रकार परिषद गुंडाळली. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनात पोहोचले. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापौर हा शिवसेनेचाच होईल असा दावा केला. मुंबईचा महापौरच नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही शिवसेनाच ठरवेल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा