'ठाणे सेनेचं खणखणीत नाणंच', एकनाथ शिंदेंनी गड राखला

'ठाणे सेनेचं खणखणीत नाणंच', एकनाथ शिंदेंनी गड राखला

  • Share this:

eknath_shinde23 फेब्रुवारी :  ठाण्यात आवाज शिवसेनेचाच हे महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या विजयाचं श्रेय जातं ते शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना.  ठाण्यात यावेळी शिवसेनेनं मोठ्या संख्येनं महिलांना उमेदवारी दिली आणि हा फॉर्म्युला यशस्वी ठरला.

ठाणे महापालिकेत 131 जागा आहेत. शिवसेनेनं इथं आपली ताकद दाखवत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा स्थान मिळवलंय.  शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना हे इथे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेनेनं सर्वाधिक 42 जागा जिंकल्या आहेत.  भाजपला शिवसेनेने इथं बरंच मागे टाकलंय. भाजपला 14 जागांवर समाधान मानावं लागलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र इथं बऱ्याच पडझडीनंतरही आपलं स्थान थोडंफार टिकवलं. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदेंचा पराभव झालाय. त्यामुळे त्यांनी अंतर्गत वाद मिटवून पक्षाच्या हितासाठी काम करायला हवं हाच संदेश त्यांना मिळालाय.

ठाण्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते होते पण त्यांच्यातल्या अंतर्गत गटबाजीनं पक्ष कमजोर पडलाय. ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्याची फूस लावणाऱ्या नेत्यांना पक्ष कसं काबूत आणणार हा प्रश्न आहे. पण तूर्तास तरी ठाण्यावर शिवसेनेचं वर्चस्व दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 07:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading