23 फेब्रुवारी : बीड जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचं मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 6 पैकी 6 जागा जिंकत भाजपचा सुपडा साफ केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंशी पंकजा मुंडेंची टक्कर होती.
याआधीही झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे पंकजांनी पराभव स्विकारत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळीमध्येच भाजपचा हा पराभव झाल्याने पंकजा यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, पंकजा मुंडेचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, त्यांनी दिला तरी स्वीकारणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv