S M L

Nashik Municipal Election Results 2017 : नाशिकमध्ये मनसेचा सुपडा साफ ; 'कमळ' उमलले

Samruddha Bhambure | Updated On: Feb 23, 2017 05:41 PM IST

Nashik Municipal Election Results 2017 :  नाशिकमध्ये मनसेचा सुपडा साफ ; 'कमळ' उमलले

23 फेब्रुवारी : नाशिक महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा पार धुव्वा उडालाय आणि भाजपने जोरदार मुसंडी मारलीय. अवघ्या पाच वर्षांत इथे मनसेचं साम्राज्य धुळीला मिळाल्याचं चित्र आहे. मनसेला आपल्या या बालेकिल्ल्यात अवघ्या तीन जागा मिळवता आल्या. मागच्या निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती हे सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही, असं चित्र इथे आहे.

नाशिकमध्ये मनसेनं कसं चांगलं काम केलंय हे राज ठाकरेंनी प्रेझेंटेशन सादर करून वारंवार सांगून पाहिलं. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असंच दिसतंय. मराठी कलाकार आणि उद्योगपतींनी कौतुक करूनही मतदारांनी मात्र मनसेकडे पाठ फिरवली.


फक्त नाशिकच नाही तर मुंबई, पुणे, ठाण्यात तरी मनसेचं काय झालंय? मागच्या वेळेस मुंबईत राज ठाकरेंनी दणदणीत यश मिळवलं होतं.  मराठीच्या मुद्द्यावर मतदारांनी राजना भरभरून मतं दिली आणि 27 नगरसेवक पहिल्याच झटक्यात निवडून दिले. पण आता मात्र मनसेला फक्त 7 जागा मिळाल्या आहे. मनसेचे माजी महापौर यतीन वाघ यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. मनसेनं पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली पण नाशिकरांनी मनसेच्या इंजिनला आता यार्डात ढकललंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 05:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close