S M L

नाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण ?

Sonali Deshpande | Updated On: Feb 23, 2017 09:26 AM IST

नाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण ?

प्रशांत बाग, 23 फेब्रुवारी : नाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण,याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. नाशिकमध्ये एकूण 31 प्रभाग आहेत आणि एकूण जागा 122 आहेत तर उमेदवार 821 आहेत.

नाशिकमध्ये एकूण मतदार 10 लाख 73 हजार 407 आहेत. त्यात पुरुष मतदार 5 लाख 70 हजार 699, महिला मतदार 5 लाख 2 हजार 636 आणि तृतीयपंथी 73 आहेत.

2012ला नाशिकमध्ये 57 टक्के मतदान झालं होतं, पण आता 2017 ला 61.60 टक्के विक्रमी मतदान झालंय.हा वाढलेला टक्का त्रिशंकूकडे वाटचाल करणारा ठरू शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

नाशिकमध्ये या वारसांमुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Loading...

दिग्गज वारस -

- नयना घोलप (सेना नेते बबन घोलप यांची कन्या)

- स्नेहल चव्हाण (शिक्षण सभापती संजय चव्हाण यांची कन्या)

- प्रशांत दिवे (माजी महापौर अशोक दिवे यांचा पुत्र)

- मच्छीन्द्र सानप (भाजप आमदार बाळासाहेब सानप यांचा पुत्र)

- प्रथमेश गीते (भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांचा पुत्र)

- प्रेम पाटील (माजी महापौर दशरथ पाटील यांचा पुत्र)

- राहुल दिवे (माजी महापौर अशोक दिवे यांचा पुत्र)

- योगेश हिरे (भाजप आमदार सीमा हिरे यांचे दीर)

- हिमगौरी आडके (भाजप आमदार डॉ राहुल अहेर यांची बहीण)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 09:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close