S M L

BMC Elections 2017 Results Live: थोड्याच वेळात महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2017 08:10 AM IST

BMC Elections 2017 Results Live:  थोड्याच वेळात महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल

23 फेब्रुवारी : मुंबईचा बिग बॉस कोण?, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक कुणाचं? या सर्व प्रश्नाचा उलगडा आता अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे. राज्यातल्या १० महापालिका आणि 25 जिल्हा परिषदां निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला अवघ्या काही तासांत सुरुवात होईल.

महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकाल सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये पहिला कल येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीये. यावेळी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सत्ताधाऱ्यांना फटका बसणार का ? हे ही पाहण्याचं ठरणार आहे.

या निकालामुळे सत्तेची समीकरणं कशी बदलतात, कोणत्या पक्षाची ताकद वाढते, कुणाची कमी होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.यात सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार याची.. ३५ हजार कोटींपेक्षाही जास्त बजेट असणाऱ्य़ा या पालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो, त्यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 08:06 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close