S M L

मुंबई कुणाची? आज फैसला

Samruddha Bhambure | Updated On: Feb 23, 2017 08:04 AM IST

bmc

23 फेब्रुवारी :  महापालिका निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 21 तारखेला झालेल्या महापालिका निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

या निकालामुळे सत्तेची समीकरणं कशी बदलतात, कोणत्या पक्षाची ताकद वाढते, कुणाची कमी होते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यात सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार याची. ३५ हजार कोटींपेक्षाही जास्त बजेट असणाऱ्या या पालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो, त्यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत.

मुंबईमध्ये 227 जागांसाठी 2275उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबईमध्ये प्रचारादरम्यान शिवसेना-भाजप मध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांची मुंबईमध्ये जास्त चर्चा नाही. खरी लढत ही एके काळचे मित्र आणि आताचे पक्के वैरी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. आज मुंबईमध्ये भगवा कायम राहणार की कमळ फुलणार याकडे राज्याबरोबरच देशाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 08:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close