उद्धव ठाकरे निवडणूक जिंकणार की हरणार ?

उद्धव ठाकरे निवडणूक जिंकणार की हरणार ?

  • Share this:

uddhav_thackery_news22 फेब्रुवारी : 'शिवसेनेसाठी ही नवी सुरुवात आहे' अशी गर्जना करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याची घोषणा केली आणि स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मुंबईत उद्धव ठाकरे जिंकणार की हरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचं काय होणार ? असा सवाल उपस्थिती केला जात होता. पण,  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली आणि जिंकलीही. पण शिवसेनेला हव्या तितक्या जागा मिळू शकल्या नाही. शेवटी भाजपसोबत पुन्हा युती करावी लागली आणि सत्तेत भागीदार व्हावं लागलं. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपने मोठा भाऊ असल्याचं मान्य करा असा दावा करत सेनेच्या जागेचा प्रस्ताव धुडकावून लावला.

त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन 25 वर्ष युतीत सडली असा विखारी आरोप करत युती तोडण्याची घोषणा केली. तसंच युती करणार नाही असा निर्धारही केला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं प्रचाराचा धुराळा उडवला. उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा सामनाच रंगला होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनलीये.

शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे या निवडणुकीवरुन स्पष्ट होईल हे ही तितकंच खरं आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे ही निवडणूक जिंकता की हरता हे पाहण्याचं ठरणार आहे.

आयबीएन लोकमतचे काही सवाल  

देशातली सगळ्यात मोठी महापालिका उद्धव ठाकरे जिंकतील का?

मुंबई महापालिका जिंकली तर बाळासाहेबांच्या सावलीतून सेना-उद्धव दोन्ही बाहेर पडतील का?

भाजपच्या विजयी रथाला महाराष्ट्रात अडवल्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना मिळेल का?

उद्धव ठाकरेंनी मुंबई एकहाती राखली तर देश पातळीवरही सेनेची प्रतिष्ठा वाढेल का?

उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिका जिंकली तर भाजपसोबत चर्चा करताना त्यांच्या शब्दाला वजन येईल का?

उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिका जिंकली तर राज्यातही स्वबळावर लढायला बळ मिळेल का?

उद्धवनी मुंबई एकहाती जिंकली तर राज्य सरकारमधली समीकरणं बदलतील का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 22, 2017, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading