स्काईपलाही आता 'आधार'

स्काईपलाही आता 'आधार'

  • Share this:

skypae_Adhar22 फेब्रुवारी : ऑनलाईन चॅट सेवा स्काईपला आधार क्रमांकानं जोडणार असल्याची घोषणा आज मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी केली.

स्काईपवर चॅट करायचं असेल, पण समोरच्या व्यक्तीच्या ओळखीची खात्री नसेल, तर ती व्यक्ती स्वतःचा आधार क्रमांक टाकून स्वतःची ओळख पटवू शकते.

चॅट संपल्यावर आधार क्रमांक मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमधून डिलीट होईल. ऑनलाईन सरकारी सेवाही आधार वापरून ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील, असंही नडेला म्हणाले. ते एका मोठ्या परिषदेसाठी आज मुंबईत आहेत. क्लाऊड कॅप्युटिंगचा वापर एसबीआयनंही कसा सुरू केलाय, हेही त्यांनी समजवून सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 22, 2017, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading