एकनाथ खडसे झोटिंग समितीपुढे हजर

  • Share this:

khadse33322 फेब्रुवारी : महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून नातेवाईकांना जमिनी दिल्याच्या प्रकरणात एकनाथ खडसे न्यायमूर्ती झोटिंग समितीपुढे हजर झाले.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन आपल्या नातेवाईकांना दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. एकनाथ खडसे यांची उलटतपासणी घेण्यासाठी त्यांना समितीसमोर बोलावण्यात आलं होतं.

महसूल मंत्री असतांना उद्योग खात्याशी निगडीत असलेल्या जमिनीसंदर्भात त्यांनी बैठका कशा घेतल्या याची विचारणा चौकशी आयोगाने त्यांच्याकडे केली.

खडसेंवर झालेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्यासाठी हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 06:50 PM IST

ताज्या बातम्या