S M L

मुंबईचं राजकीय गणित काय?

Sachin Salve | Updated On: Feb 22, 2017 06:48 PM IST

मुंबईचं राजकीय गणित काय?

22 फेब्रुवारी : राज्यात १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात काल मतदान झालंय. महानगरी मुंबईमध्ये सुमारे 55 टक्के मतदान झालं. मागच्या वेळेपेक्षा आता मुंबईत मतदानाचा टक्का वाढला पण तरीही मतदारांचा उत्साह हवा तेवढा पाहायला मिळाला नाही. उद्या १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणाराय. मतदान संपलंय आता उमेदवारांची धाकधूक वाढलीय.

उमेदवारांनीनी अहोरात्र मेहनत घेतली आणि काल परीक्षा पार पडलीय. आता उद्या निकाल लागणार आहे. पण त्याआधी अॅक्सिस - इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्ये काही अंदाज व्यक्त करण्यात आलेत. यानुसार मुंबईत शिवेसना -भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. मुंबईमध्ये शिवसेना क्रमांक एकचा पक्ष असेल.

पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिवसेना यांच्या जागांमध्ये फारच कमी अंतर राहील आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील, अशी शक्यता आहे...तर दुसरीकडे 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झालंय.आता वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे.

यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी अस्मितेची आहे तर भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे मुंबईवर सत्ता कोणाची याबाबत जेवढी उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे तेवढीच ती सर्व पक्ष बड्या नेत्यांमध्येही आहे.

मुंबईचं राजकीय गणित काय?

Loading...

.........................

मुंबईत मतांचा टक्का वाढला, फटका

सेनेला बसणार का? भाजपला फायदा?

मुंबईत 114 हा बहुमताचा आकडा,

सेना-भाजप दोघांनाही कमी पडण्याची चिन्हं

एक्झिट पोलमध्ये सेनेला शंभरी

गाठतानाही दमछाक, भाजपही बरोबरीत

स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर पुन्हा शिवसेना

भाजप कडवट प्रचार विसरून एकत्र येतील?

शिवसेनेनं भाजपची साथ घ्यायची नाही ठरवलं

तर मनसे-राष्ट्रवादी-अपक्षांना सोबत घेणार?

बहुमतासाठी जास्त पक्षांच्या डोकेदुखीऐवजी

काँग्रेसला सोबत घेणार का शिवसेना?

भाजप-मनसेला वगळून काँग्रेस-राष्ट्रवादीची

साथ घेतली तर राज्यात सेनेचा संदेश काय जाईल?

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर बहुमतासाठी

शिवसेनेला सोबत घेणार की मनसे-राष्ट्रवादीला?

भाजपनं शिवसेनेला सोबत घेतलं नाही तर

राज्यातल्या सत्तेतून शिवसेना बाहेर पडेन?

शिवसेना गरज पडली तर भाजपसोबत राज्यासारखं

पालिकेत दुय्यम स्थान स्वीकारणार का?

मनसेच्या 10 जरी जागा आल्या तरी सेना किंवा

भाजपसाठी किंगमेकर ठरणार की काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 04:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close