S M L

मुंबईची हवा सेहत के लिए हानीकारक!

Sonali Deshpande | Updated On: Feb 22, 2017 12:50 PM IST

मुंबईची हवा सेहत के लिए हानीकारक!

22 फेब्रुवारी : देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे.केंद्र सरकारने 94 शहरात सर्वाधिक वायुप्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 2011 ते 2015 दरम्याच्या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुख्य शहरे वगळता महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर या शहरांतील हवा अत्यंत वाईट आहे.महाराष्ट्रात पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरात हवेतील धोकादायक कणांचं अतिरिक्त प्रमाण आहे. त्यासोबतच नायट्रोजन डाय ऑक्साईड या वायुप्रदूषण करणाऱ्या एका अत्यंत धोकादायक पदार्थाची पातळीही अधिक आहे.या प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्र्यांनी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 12:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close