उदयनराजेंच्या गाडीवर दगडफेक,भावावरच आरोप

उदयनराजेंच्या गाडीवर दगडफेक,भावावरच आरोप

  • Share this:

udayan

22 फेब्रुवारी : सातारा जिल्हापरिषद निवडणुकीच्या काल झालेल्या निवडणुकीदरम्यान साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे सातारा आणि मेढा या ठिकाणी रात्री बराच वेळ तणाव होता. उदयनराजे भोसले यांनी यामागे त्यांचेच बंधू शिवेंद्रराजे भोसलेंचा हात असल्याचं म्हटलंय.

काल जिल्हापरिषद पंचायत समिती मतदानादरम्यान साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे जावळी तालुक्यातील खर्शी या ठिकाणी गेले होते.त्याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत माणकुमरे आणि त्यांच्या पत्नी यांना धक्काबुक्की केली असा आरोप वसंत माणकुमरे यांनी केला आहे आणि त्यामुळेच चिडलेल्या जमावाने खा. उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

खा.उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.या घटनेत त्यांचेच बंधू आ. शिवेंद्रराजे भोसले यांचाच हात असल्याचा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 12:28 PM IST

ताज्या बातम्या