मतदानाचं आवाहन करणाऱ्या सुपरस्टार्सची मतदानाला बुट्टी

मतदानाचं आवाहन करणाऱ्या सुपरस्टार्सची मतदानाला बुट्टी

  • Share this:

465022-hrithik-akshay-aamir

22 फेब्रुवारी : मुंबईसह राज्यभरातील दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. राज्यभरातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र बॉलिवू़डमधील अनेक सुपरस्टार्सनी मतदानाला बुट्टी मारली. आमिर खान, हृतिक रोशन, अनुपम खेरसह अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.

विशेष म्हणजे मतदानाचं आवाहन करणारे आमिर खान, अनुपम खेर, जावेद अख्तर, अक्षय कुमार यांच्यासारख्या अभिनेत्यांनीही मतदान चुकवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नोकरीच्या वेळा सांभाळून सर्वसामान्य मतदारांनी आपला हक्क बजावला असताना बॉलिवूड स्टार्सनी मात्र शूटिंगलाच प्राधान्य दिल्याचं समोर आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading