22 फेब्रुवारी : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा आगामी सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा'चं पोस्टर काल लाँच करण्यात आलं. अक्षयने ट्विटरवरून हा फोटो लाँच केला. त्यात तो आणि भूमी लग्नाच्या जोडीत दिसताहेत. अक्षयने नोटांची माळ घातलेली दिसत्येय तर भूमीने लाल रंगाचा 'शादी का जोडा' घातलेला दिसतोय.
केशव आणि जयाची वेगळी लव्हस्टोरी २ जूनला तुमच्या भेटीला येतेय, अशी पोस्टही त्याने फोटोसोबत शेअर केली आहे. स्वच्छ भारत अभियान आणि घर घर में शौचालय या योजनांवर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटाच्या नावामुळे सगळ्यांच्या मनात त्याविषयी उत्सुकता आहेच. चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीनारायण सिंग करताहेत तर चित्रपट जूनच्या पहिल्या आठवड्यात थिएटर्समध्ये येईल. अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी २' हा सिनेमा सध्या तुफान चालतोय. त्याच्या याही चित्रपटाला आमच्या खूप शुभेच्छा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा