News18 Lokmat

10 पालिकांसाठी 'अब तक 56' तर जि.परिषदेसाठी 69 टक्के मतदान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2017 10:04 PM IST

2beb1aae-5049-47f0-aafa-30a17530c750

21 फेब्रुवारी : राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30 टक्के तर 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.

महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी

Loading...

बृहन्‍मुंबई- 55

ठाणे- 58

उल्हासनगर- 45

पुणे- 54

पिंपरी-चिंचवड- 67

सोलापूर- 60

नाशिक- 60

अकोला- 56

 अमरावती- 55

नागपूर- 53

 एकूण सरासरी- 56.30.

 

जिल्हा परिषदनिहाय

 मतदानाची टक्केवारी

रायगड- 71

रत्नागिरी- 64

सिंधुदुर्ग- 70

नाशिक- 68

पुणे- 70

सातारा- 70

सांगली- 65

सोलापूर- 68

कोल्हापूर- 70

अमरावती- 67

गडचिरोली- 68

सरासरी- 69.43

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...