दहा महापालिकांसाठी मतदानाची पन्नाशी,आता फैसला जनतेचा

  • Share this:

56election_counting21 फेब्रुवारी : राज्यातल्या दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांसाठी मतदान संपलं. महापालिकांसाठी सरासरी 50 ते 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झालंय. तर मुंबई महापालिका निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याचा अंदाज आहे.

जिल्हा परिषदांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं. गावागावांत मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं. जिल्हा परिषदांच्या 2 हजार 956 उमेदवारांचे तर महापालिकांच्या 9 हजार 208 उमेदवारांचं  भवितव्य मतपेटीत बंद झालंय. आता सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागलीये.

मुंबईत रेकाॅर्ड ब्रेक मतदान

मुंबई महापालिकेसह 10 महापालिकांसाठी मतदान संपलंय. आतापर्यंत 50 च्यावर मतदानाचा टक्का न गाठणाऱ्या मुंबईत यंदा रेकाॅर्ड मोडण्याची शक्यता आहे. मुंबईत  दुपारी साडेतीनपर्यंत 41.32 टक्के मतदान झालंय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी पन्नासच्या घरात जाणार असल्याची दाट शक्यता आहे.  2012 मध्ये मुंबईत 44 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे मतदानात मुंबईकर यावेळी 50 पार करता का हे पाहण्याचं ठरणार आहे.

राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटी मतदानाला

सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राजकीय नेत्यांनी मतदान केंद्राकडे कूच केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या नातीसोबत मतदान हक्क बजावला.अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मताना हक्क बजावला. तसंच काँग्रेसचे नेते गुरुदास कामत, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading