S M L

माओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2017 04:34 PM IST

माओवादग्रस्त गडचिरोलीत 60 टक्के मतदान

 

21 फेब्रुवारी :  गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सरासरी 60 टक्के मतदान झालं. गडचिरोलीमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा होता. दक्षिण गडचिरोलीमधल्या दुर्गम भागात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला.

अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या माओवादग्रस्त भागात हे मतदान होतं. त्यामुळे मतदानासाठी कडेकोट सुरक्षा होती.आदिवासींनी मतदान केंद्रांपर्यंत 10 ते 15 किमी पायी जाऊन मतदान केलं. माओवाद्यांच्या दहशतीला न जुमानता आदिवासींनी मतदानाला जोरदार प्रतिसाद दिला.


गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघटना अशी तिरंगी लढत आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश अत्राम आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांच्यामधला संघर्ष या निवडणुकीतही पाहायला मिळतोय. धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यांच्या 2 मुली, पुतणी आणि पुतण्या अशा 4 जणांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे अंबरीश अत्राम यांच्यासमोर घरातल्याच प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान आहे.

दक्षिण गडचिरोलीमध्ये सूरजागडचं लोहखनिज उत्खनन आणि मेडीगट्टा धरण प्रकल्प हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सूरजागडमधल्या बेकायदेशीर खाणकामाच्या विरोधात आदिवासींच्या इलाका ग्रामसभेनेही उमेदवार उभे केलेत. त्यांनाही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 04:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close