S M L

'जिओ'चा धमाका, 'त्या' ग्राहकांसाठी 303 रुपयात अनलिमिटेड डेटागिरी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2017 04:11 PM IST

'जिओ'चा धमाका, 'त्या' ग्राहकांसाठी 303 रुपयात अनलिमिटेड डेटागिरी

21 फेब्रुवारी :  'रिलायन्स जिओ' चे 170 दिवसांत 10 कोटी ग्राहक झालेत, असं रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केलंय. मुकेश अंबानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा केली.

रिलायन्स जिओची ऑफर 31 मार्चला संपतेय. नंतरही जिओच्या प्राईम ग्राहकांना काही सवलती मिळणार आहेत. जिओच्या प्राईम ग्राहकांना मार्च 2018 पर्यंत दरमहिना 303 रुपयांचा अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओ च्या पहिल्या 10 कोटी ग्राहकांसाठी प्राईम मेंबरशिपही असणार आहे.

पहिल्या 10 कोटी ग्राहकांना रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप मिळणार आहे.  त्याचबरोबर नव्या ग्राहकांसाठी 31 मार्चपर्यंत 99 रुपयांमध्ये ही मेंबरशिप मिळेल. 1 एप्रिलपासून यासाठीचा टेरिफ प्लॅन लागू होईल. यामध्ये व्हॉईस कॉल आणि रोमिंग फ्री असेल. वर्षभरासाठी  महिन्याला 303 रुपये द्यावे लागतील. सगळ्या सेवांसाठी 20 टक्के जास्त डाटा असेल.

1 सप्टेंबर 2016 पासून गेल्या 170 दिवसांमध्ये रिलायन्सचे 10 कोटी ग्राहक झालेत. प्रत्येत सेकंदाला 7 नव्या ग्राहकांची नोंद झाली, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. एक महिन्यात 100 कोटी GB डेटाचा वापर झाला, असंही ते म्हणाले.

अमेरिकेत जेवढा मोबाईल डेटाचा वापर होतो तेवढाच डेटा जिओ ग्राहक वापरतात. मोबाईल डाटाच्या वापरामध्ये भारत आता सर्वात पुढे आहे. जिओच्या माध्यमातून मिनिटाला 2 कोटी व्हॉईस कॉल होतात ही आकडेवारीही मुकेश अंबानी यांनी दिली. 2017 या वर्षभरात देशातल्या 99 टक्के नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलंय, असंही त्यांनी जाहीर केलं.

रिलायन्स जिओ नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात 4G चं जाळं उभारण्यात आलंय. त्यामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना याचा फायदा होतो, असं मुकेश अंबानींनी सांगितलं. भारतातल्या सगळ्या टेलिकॉम ऑपरेटर्सच्या दुप्पट बेस स्टेशन्स रिलायन्स जिओने उभारलीयत, असंही ते म्हणाले.

'रिलायन्स जिओ'चा विक्रम

- 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहक

- प्रत्येक सेकंदाला सात नवे ग्राहक

- महिन्याला 100 कोटी GB डेटा चा वापर

- अमेरिकेत जेवढा मोबाईल डेटाचा वापर होतो तेढाच डेटा जिओ ग्राहक वापरतात

-जिओच्या माध्यमातून मिनिटाला 2 कोटी व्हॉईस कॉल

- 2017 या वर्षभरात देशातल्या 99 टक्के नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य

काय आहे 'जिओ प्राईम' मेंबरशिप ?

- पहिल्या 10 कोटी ग्राहकांसाठी ही मेंबरशिप असेल

- नव्या ग्राहकांसाठी 31 मार्चपर्यंत 99 रुपयात मेंबरशिप

- 1 एप्रिलपासून टेरिफ प्लॅन लागू होणार

- त्यात व्हाईस कॉल आणि रोमिंग फ्री असेल.

- वर्षभरासाठी महिन्याला 303 रुपये

- सर्व सेवांसाठी 20 टक्के जास्त डेटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close