उल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला

 उल्हासनगरमध्ये माजी महापौराच्या गाडीवर हल्ला

  • Share this:

ulasnagar_221 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिका निवडणूक पॅनल 9 च्या उमेदवार आणि माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाड़ीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

आशा इदनानी या सपना गार्डन परिसरात मतदानाला आल्या असता जमावाने गाडीला घेराव घातला आणि त्यांच्या गाडीवर दगड टाकून हल्ला चढवला. यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून या गाडीत माजी महापौर होत्या. मात्र त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

याप्रकरणी आशा इदनानी आणि साईं पक्षाचे अध्यक्ष जीवन इदनानी यांनी पोलिसात तक्रार केली असून, ओमी कलानी आणि त्यांचे समर्थक पोलीस सुरक्षा घेवून विरोधी उमेदवारावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोप राजू इदनानी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading