News18 Lokmat

मतदार यादीत नाव नसल्यामुळे वरुण धवन नाराज

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2017 03:49 PM IST

मतदार यादीत नाव नसल्यामुळे वरुण धवन नाराज

21 फेब्रुवारी :   मुंबईत आज महापालिकेसाठी मतदान होत असून मुंबईकरांनी मतदानसाठी रांगा लावल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले आहेत. अभिनेता वरूण धवनही इतरांप्रमाणे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेला होता. मात्र मतदान न करताच त्याला परतावं लागलं. मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्याला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही.

‘हा सर्व प्रकार विचित्र आहे. मतदार यादीत माझे नावच नाहीये. त्यामुळे आता माझे नाव आहे तरी कुठे याची विचारणा मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे’, असं म्हणत वरुणने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात आज १० महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. काही ठिकाणी मतदान सुरळीत सुरू आहे तर अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. तर अनेक ठिकाणी मतदार यादीत अनेकांची नावेच नाहीयेत. त्यामुळे अनेकांना मतदान करताच आले नाही.

वरुणप्रमाणेच अभिनेते प्रदीप वेंगुर्लेकर यांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदान करता आलेले नाही आणि त्याबद्दल त्यांनी खंतसुद्धा व्यक्त केली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...