मतदार यादीत घोळ,नागरिक उतरले रस्त्यावर

मतदार यादीत घोळ,नागरिक उतरले रस्त्यावर

  • Share this:

nashik_21 फेब्रुवारी : महापालिका आणि 11 जिल्हा परिषदासाठी मतदान सुरू आहे. मात्र, मतदार यादीतून नावं गायब झाल्याचे प्रकार समोर आले आहे. नाशिकमध्ये मतदार याद्यातून नावं नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

नाशिकमध्ये प्रभाग क्र १ म्हसरूळमध्ये मतदानाला सुरुवात झाली. मोठ्या उत्साहाने मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या पदरी मात्र निराशा आली. मतदान याद्यात नावचं नसल्यामुळे गोंधळ उडाला. मतदान ओळखपत्र असून सुद्धा मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी काही काळ नाशिक गुजरात हायवेवर रास्ता रोकोही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading