News18 Lokmat

शरद पवारांनी नातीसोबत, तर राज ठाकरेंचं कुटुंबासोबत मतदान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2017 11:11 AM IST

शरद पवारांनी नातीसोबत, तर राज ठाकरेंचं कुटुंबासोबत मतदान

[wzslider]

21 फेब्रुवारी : 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झालीये. उन्हाचा पारा वाढतोय त्यामुळे सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राजकीय नेत्यांनी मतदान केंद्राकडे कूच केलीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या नातीसोबत मतदान हक्क बजावला.अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मताना हक्क बजावला. तसंच काँग्रेसचे नेते गुरुदास कामत, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...