News18 Lokmat

'आधी मतदान नंतर लगीन', नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2017 10:08 AM IST

'आधी मतदान नंतर लगीन', नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर

[wzslider autoplay="true"]

21 फेब्रुवारी : 'मुंबई मेरी जान...'असं उगाच म्हटलं जात नाही. कारण, या मुंबईवर प्रेम करणारे मुंबईकर मतदानासाठी सकाळीच रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने 'आधी लगीन...' असं म्हणत मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईत मतदानांचा टक्का वाढत नाही, मतदान कमी होतं अशी ओरड नेहमी ऐकायला मिळतं. पण आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईकर भल्यापहाटे मतदानाला बाहेर पडले. दक्षिण मुंबई जीटी हाॅस्पिटल परिसरात अंकित लेंडे या तरुणाने बोहल्यावर चढण्याआधी मतदान केलं. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर आधी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावणं पसंत केलं. मतदान करण्यासाठी तो थेट शेरवानीमध्ये मतदान केंद्रावर अवतरला. त्याच्यासोबत वऱ्हाडीमंडळीही सोबत होती. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अंकित लग्नसोहळ्याकडे रवाना झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...