नागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूरमध्ये मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

  • Share this:

Mohan bhagwat

21 फेब्रुवारी : महापालिका निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारत महिला विद्यालय मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला आहे.

10 महानगरपालिकेच्या 1268 जागांसाठी  9 हजार 208 उमेदवार ,  ११ जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2956 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदान झाल्यानंतर २३ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदाना करता बाहेर पडून आपला हक्क बजावावा आणि लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा यासाठी IBN लोकमत आवाहन करत आहे.

यावेळी पहिल्यांदाच मनपा तसंच जिल्हा परिषदेसाठी नोटाचा पर्याय देण्यात आला आहे. प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाल्या असून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading