21 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवारांचं मतदान आहे, त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही.
वॉर्ड क्रमांक 214मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत
एकेकाळचा आघाडी पार्टनर काँग्रेस की आपल्या मित्राचा पक्ष शिवसेना, हे पाहावं लागेल. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे त्याचा अर्ज रद्द झाला, असं अहिर म्हणाले..
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा