मतदान संपलं, मुंबईत रेकाॅर्डब्रेक मतदान होण्याची शक्यता

मतदान संपलं, मुंबईत रेकाॅर्डब्रेक मतदान होण्याची शक्यता

  • Share this:

mumbai_voting

21 फेब्रुवारी :   मुंबई महापालिकेसह 10 महापालिकांसाठी मतदान संपलंय. आतापर्यंत 50 च्यावर मतदानाचा टक्का न गाठणाऱ्या मुंबईत यंदा रेकाॅर्ड मोडण्याची शक्यता आहे. मुंबईत  दुपारी साडेतीनपर्यंत 41.32 टक्के मतदान झालंय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी पन्नासच्या घरात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. 2012 मध्ये मुंबईत 44 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे मतदानात मुंबईकर यावेळी 50 पार करता का हे पाहण्याचं ठरणार आहे.

तर दुसरीकडे पुणेकरांनी उत्स्फुर्तपणे मतदान केलंय. त्यामुळे पुण्यातही मतदानाचा टक्का वाढण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात दुपारी 3.30 पर्यंत 42.92 टक्के मतदान झालंय. त्यानंतर ठाण्यात 45 टक्के, उल्हासनगरमध्ये 35 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 43.80 टक्के, नागपूर 45, अमरावती 41, अकोला 46 टक्के मतदान झालंय. त्यामुळे मतदान संपेपर्यंत मतांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

साडेतीन वाजेपर्यंत मतदान

बृहन्‍मुंबई- 41.32

ठाणे- 45.05

उल्हासनगर- 35.25 %

नाशिक- 43.20

पुणे- 42.92

पिंपरी चिंचवड- 43.80

सोलापूर- 43

अमरावती- 41.24

अकोला- 46.28

नागपूर- 45.7

सरासरी- 42.80

========================================================================================================

दुपारी 1.30 पर्यंतचे मतदान

बृहन्‍मुंबई- 32.17

ठाणे- 35.11

उल्हासनगर- 24.83

नाशिक- 30.63

पुणे- 30.52

पिंपरी चिंचवड- 30.86

सोलापूर- 32.00

अमरावती- 31.62

अकोला- 32.39

नागपूर- 29.95

सरासरी- 31.01

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती

मतदान टक्केवारी (1.30 पर्यंत)

रायगड- 44.58

रत्नागिरी- 38.56

सिंधुदुर्ग- 45.27

नाशिक- 34.33

पुणे- 39.68

सातारा- 42.23

सांगली- 38.28

सोलापूर- 36.81

कोल्हापूर- 43.59

अमरावती- 32.02

गडचिरोली- 44.67    

 

voting_banner============================================================================================================

महानगरपालिका निवडणुकांसाठी सकाळी 11.30 पर्यंतचे मतदानाचे प्रमाणे

बृहन्‍मुंबई- 16.04

ठाणे- 19.30

उल्हासनगर- 12.87

नाशिक- 18.54

पुणे- 17.61

पिंपरी चिंचवड- 20.73

सोलापूर- 17.00

अमरावती- 19.58

अकोला- 19.24

नागपूर- 16.00

सरासरी- 17.07

=================================================================================================

10 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

मुंबई - 8.7

नाशिक - 7.15

ठाणे - 10

उल्हासनगर - 5.97

पुणे -12

पिंपरी चिंचवड - 7

सोलापूर - 9.5

अमरावती - 7

अकोला - 9

नागपूर - 9

- पुणे 12 टक्के मतदान

- ठाणे पहिल्या 2 तासात 10.38 टाके मतदान जाले आहे

- पिंपरीत पहिल्या दोन तासात 7 टक्के मतदान

- अमरावती 9.30 पर्यंत - 7 टक्के मतदान

नाशिक महापालिका निवडणूक - सकाळी 9:30 पर्यंत 6.48

टक्के मतदान

- अकोला - 7 टक्के मतदान

- नागपुरात पहिल्या दोन तासात फक्त 10 टक्के मतदान - उल्हासनगर मध्ये पाहिल्या दोन तासात 7 टक्के मतदान झाले

- सोलापूर - ७ टक्के

VOTING WEB copy

21 फेब्रुवारी : राज्यातल्या १० महापालिकांसाठी उद्या मतदान होतंय. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, उल्हासनगर, नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला या महापालिकांसाठी हे मतदान आहे. तर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही मतदान होत आहे.

उद्याच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि आपलं कर्तव्य बजावावं, असं आवाहन निवडणूक आयोगाने केलंय. मुंबई वगळता बाकीच्या शहरांमध्ये चार वॉर्ड मिळून एक प्रभाग करण्यात आलाय. मतदारांनी चारही वॉर्डांतल्या उमेदवारांची निवड करायची आहे. त्यामुळे उमेदवारांसमोरचं आव्हान वाढलंय.

या महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये महिलांचं प्राबल्य आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांना ५० टक्के आरक्षण देण्याचा हा निर्णय २०१२ पासून लागू झालाय. दोन दिवसांनी म्हणजे 23 तारखेला जनतेचा फैसला जाहीर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 05:35 PM IST

ताज्या बातम्या