मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग; शिवसेनेची आयोगाकडे तक्रार

  • Share this:

Sanjay raut131

20 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकांच्या प्रचार तोफा काल थंडावल्या आहेत. प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासून माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. हा सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार शिवसेनेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी आज निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर सायंकाळी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतींवर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला.

काल अधिकृतपणे प्रचार संपला असतानाही आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून ते प्रचार करत आहेत. हा मतदारांवर प्रभाव आणि दबाव टाकण्याचाच प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अशाप्रकारे मतदारांवर दबाव टाकण्याचा कोणताही अधिकार नाही, असं राऊत म्हणाले. मुलाखती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिली असेल तर तशी परवानगी सगळ्यांना मिळायला हवी, असंही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 09:25 PM IST

ताज्या बातम्या