20 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह सगळ्यात पक्षांची कसोटी लागणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावतोय. मुंबईमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा 'सामना' सुरू आहे. पण मुंबईसोबतच सगळ्याच महापालिकांमध्ये कशा लढती आहेत यावर एक नजर...
मुंबई
देशभरातली सगळ्यात मोठी, श्रीमंत महापालिका
मुंबई महापालिकेत २२७ जागा
छोट्या राज्यांइतकं महापालिकेचं बजेट
प्रत्येक वॉर्डमध्ये अंदाजे मतदार - ५० ते ५५ हजार
सत्ताधारी पक्ष : भाजप - शिवसेना
युती तुटल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस
उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला
मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीचा भाजपला होणार किती फायदा ?
पुणे
पुणे महापालिकेत १६२ जागा
४ वॉर्डांचा मिळून एक प्रभाग
मतदार चारही उमेदवारांसाठी करणार मतदान
सत्ताधारी पक्ष : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी
पुण्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी
राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पहिल्या नंबरसाठी स्पर्धा
पिंपरी - चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेत 128 जागा, 804 उमेदवार
४ वॉर्डांचा मिळून एक प्रभाग
सत्ताधारी पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस
128 पैकी 82 जागा राष्ट्रवादीकडे
राष्ट्रवादी पिंपरी - चिंचवडचा गड राखणार का ?
नाशिक
नाशिक महापालिकेत 122 जागा, 1 हजार 89 उमेदवार
सत्ताधारी पक्ष : मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी
राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन नाशिकमध्ये धावणार का ?
मनसेतून भाजप, शिवसेनेत गेलेल्या उमेदवारांकडे सर्वांचंच लक्ष
भाजप, शिवसेनेसाठीही नाशिक महत्त्वाचा गड
भुजबळांनंतर राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई
ठाणे
ठाणे महापालिकेत 131 जागा, 1 हजार 134 उमेदवार
सत्ताधारी पक्ष : शिवसेना
ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचा गड राखणार का ?
मुख्यमंत्र्यांच्या प्रचारमोहिमेनंतर भाजपचं कमळ किती ठिकाणी फुलणार ?
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीचा किती होणार फायदा ?