S M L

नकली व्होटसाठी, नकली 'बोट' !

Samruddha Bhambure | Updated On: Feb 20, 2017 09:05 PM IST

नकली व्होटसाठी, नकली 'बोट' !

20 फेब्रुवारी : राज्यात 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांसाठी मतदानाला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, बोगस मतदान करणाऱ्यांनी नामी शक्कल लढवत चक्क नक्कली बोटच तयार करून खळबळ उडवून दिलीये. हुबेहुब बोटांच्या कॅप्स तयार करण्यात आल्या असून त्या गुप्तपणे विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

1

मतदानांच्या दिवशी बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावला जातोय. ज्यावेळी तुमच्या बोटाला शाई लावली जाते ती कमीतकमी दोन आठवडे तरी बोटांवर असते. या शाईमुळे बोगस मतदान करण्यास आळा बसलाय. मात्र, बोगसखोरांनी यावरही भयंकर तोडगा काढलाय. नाशिकमध्ये चक्क बोटांचे कॅप्स तयार करण्यात आल्याची बाब उजेडात आलीये. या बोटाचे कॅप्स वापरून बोगस मतदान करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे.  या कॅप्समुळे एक व्यक्ती सहज दोनपेक्षा अधिकवेळा मतदान करू शकतो. ही बाब उजेडात आल्यानंतर प्रशासनाचे दाबे चांगलेच दणाणले आहे. या बोटांचं कॅप्स पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. हे बोटाचे कॅप्स कोणी आणि कुठे बनवले याबाद्दल अद्याप कोणचीही महिती समोर आली नाहीये.

1

दरम्यान, निवडणूक आयोगाने याविषयाची गांभीर्याने दखल घेतली असून त्याचबरोबर, कोणताही मतदार मतदानासाठी आल्यावर शाई लावताना त्यांच्या हाताचं बोटसुद्धा ओडून तापासून पहावं, अशा प्रकारच्या सुचनाही पोलिंग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. याचं कारण म्हणजे, खरोखरच जर अशा प्रकारच्या नकली बोटांची विक्री होत असेल आणि याचा वापर करून बोगस मतदान होणार असेल, तर त्याला आळा बसवण्यासाठी  सर्व प्रकरचे खबरदारीचे उपाय योजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा निवडणूक आयोगांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close