10 महापालिकांसाठी असं होणार मतदान

10 महापालिकांसाठी असं होणार मतदान

  • Share this:

evmcounting

20 फेब्रुवारी :  राज्यातल्या 10 महापालिकांसाठी उद्या मतदान होतंय. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, उल्हासनगर, नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला या महापालिकांसाठी हे मतदान आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय पण सगळ्याच महापालिकांमध्ये चुरशीची लढत आहे.

महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान आहे तर 23 फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल आहे. उद्याच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि आपलं कर्तव्य बजावावं, असं आवाहन निवडणूक आयोगाने केलंय.

मुंबई महापालिकेत 227 जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईमध्ये मतदारांनी त्या त्या वॉर्डातल्या नगसेवकांची निवड करायची आहे. पण मुंबई वगळता बाकीच्या शहरांमध्ये मात्र मतदानाची पद्धत वेगळी आहे.

मुंबई वगळता बाकीच्या शहरांमध्ये चार वॉर्ड मिळून एक प्रभाग करण्यात आलाय. मतदारांनी चारही वॉर्डांतल्या उमेदवारांची निवड करायची आहे. त्यामुळे उमेदवारांसमोरचं आव्हान वाढलंय. उमेदवारांना आपल्या प्रभागांतल्या चारही वॉर्डांमधून जास्तीत जास्त मतं मिळवावी लागणार आहेत.

मुंबई महापालिका देशातली सगळ्यात मोठी महापालिका आहे. एका वॉर्डाची मतदारसंख्याच जास्त असल्यामुळे मुंबईमध्ये ही प्रभागपद्धती करण्यात आलेली नाही.

या महापालिका निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये महिलांचं प्राबल्य आहे.  महापालिका निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांना ५० टक्के आरक्षण देण्याचा हा निर्णय 2012 पासून लागू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 20, 2017, 5:00 PM IST

ताज्या बातम्या