S M L
Football World Cup 2018

प्युमासोबत 110 कोटींचा 'विराट' करार, कोहलीचा नवा विक्रम

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 04:40 PM IST

प्युमासोबत 110 कोटींचा 'विराट' करार, कोहलीचा नवा विक्रम

Virat Kohli-110 crore

20 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच प्युमाशी 8 वर्षासाठी इंटरनॅशनल ब्रँड अँबेसेडर म्हणून 110 कोटींचा करार केला. 100 कोटींचा व्यावसायिक करार करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या करारामुळे त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची भर पडलीय.

भारतीय संघाचं कर्णधारपद मिळाल्यापासून विराट कोहली आपल्या यशाच्या उंच उंच पायऱ्या चढत आहे. जाहिरात क्षेत्रातील हा करारसुध्दा त्यापैकीच एक म्हणावा लागेल. खेळाचं मैदान असो अथवा नसो तो नेहमी आपल्या कामगिरीने सर्वोच्च जागी राहत असतो.

या डीलसाठी त्याला दरवर्षी 12 ते 14 करोड मिळतील. त्याचसोबत रॉयल्टी म्हणून काही रक्कमही मिळेल. तो आता या जर्मन कंपनीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवेल.

याविषयी बोलताना तो म्हणाला की ,'प्युमासोबत यापूर्वी जोडल्या गेलेल्या महान खेळाडूंसोबत नाव जोडलं गेल्यानं मला अभिमान वाटतोय. पेले आणि मॅराडोनासारख्या महान खेळाडूंनी त्यांच्यासोबत काम केलंय. आम्हीसुध्दा मोठ्या कालावधीसाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय. प्युमाने भारतात मिळवलेल्या लोकप्रियतेसाठी आणि टॉप ब्रँडपैकी एक असल्याचा मला फार आनंद होतोय.'

प्युमा हा स्पोर्ट्स आणि लाईफस्टाईल क्षेत्रातील अॅक्सेसरीजचा आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. उसैन बोल्ट, अस्फा पॉवेल, ऑलिव्हर गेरॉल्ड आणि थिएरी हॅरनी हे जागतिक कीर्तीचे खेळाडूसुध्दा त्याच्यासोबत आंतराष्ट्रीय ब्रँडिंग करताहेत.

सचिन आणि धोनीलाही टाकले मागे

नेहमीच सर्वच गोष्टीत विराटची तुलना धोनी आणि सचिनशी होत आलीय. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या दोन दिग्गजांशी तुलना करता येईल,अशी गुणवैशिष्ट्य विराटमध्ये आहेत. या दोघांनीही याआधी 100 करोडोंची डील केली होती मात्र ती कोणत्या कंपनीशी केली नव्हती तर काही एजन्सींशी केली होती. सचिनने 24 वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत 50पेक्षा जास्त ब्रँड्सच्या जाहिराती केल्या, ज्यासाठी त्याने 500 करोडोंपेक्षा जास्त रुपये कमावले.तर महेंद्रसिंग धोनीने 180 करोडोंची सर्वात महाग मोठी डील केली होती. आताही तो अनेक ब्रँडचा चेहरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close