कंगनाची मिस ज्युलिया की फियरलेस नादिया?

कंगनाची मिस ज्युलिया की फियरलेस नादिया?

  • Share this:

rangoon controvercy

20 फेब्रुवारी : शाहीद कपूर, सैफ अली खान आणि कंगना राणावत यांचा रंगून हा सिनेमा प्रदर्शनाअगोदरच कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.त्याचं कारण आहे, कंगना राणावतने साकरलेली 'मिस ज्युलिया' ही भूमिका. या ज्युलियाचा लूक फियरलेस नादियाशी मिळताजुळता आहे.

वाडिया मुव्हीटोन या प्राॅडक्शन कंपनीने सिनेमातल्या कंगनाच्या लूकवरून फिल्मच्या निर्माते विशाल भारद्वाजच्या विरोधांत कॉपी राइटच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा खटला दाखल केला आहे.कंपनीच दावा आहे की कंगनाची भूमिका, तिचा लूक एवढंच नाही तर तिने दिलेली फोटोची पोजसुद्धा 50च्या दशकातली अभिनेत्री फियरलेस नादियाशी मिळतीजुळती आहे.

फियरलेस नादिया ही 50च्या दशकातील एक नावाजलेली अभिनेत्री होती. 1935मध्ये आलेल्या हंटरवाली या सिनेमामध्ये स्टंट करणारी नादिया ही बॉलिवूडमधली पहिली महिला आहे.

निर्माता विशाल भारद्धाजने म्हटलंय की हा सिनेमा नादियाच्या भूमिकेवर आधारित नाही.ही एक लव स्टोरी आहे. 'रंगून' 24 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 12:10 PM IST

ताज्या बातम्या