S M L

बेन स्टोक्स ठरला सर्वात महागडा खेळाडू; इशांत शर्मा, पुजारा ‘अनसोल्ड’!

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 03:07 PM IST

बेन स्टोक्स ठरला सर्वात महागडा खेळाडू; इशांत शर्मा, पुजारा ‘अनसोल्ड’!

20 फेब्रुवारी : इंडियन प्रीमिअर लीग (IPL)च्या दहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंचा लिलावाला सुरुवात झाली असून या लिलावात आतापर्यंत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या संजीव गोयंका यांनी स्टोकसाठी तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये एवढी मोठी रक्कम मोजली आहे. त्याला कोणता खेळाडू धोबीपछाड देतो, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बेंगळुरूमध्ये आयपीएलच्या 10व्या सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात 8 संघ 350 हून अधिक खेळाडूंमधून 148.33 कोटी रुपयांचा वर्षाव करून खेळाडूंची निवड सुरू आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंची खरेदी झाली असून अजूनही बोली लावणं सुरूच आहे. बेन स्टोक्ससाठी २ कोटी रुपये बेस प्राइस होती. स्टोक्सला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये जोरदार चुरस होती. 2 कोटींवरून 4, 6,8 आणि 10 असा आकडा वाढतच गेला. त्यावर ही बोली थांबेल असं वाटत होतं. मात्र, आकडा वाढतच गेला. अखेर पुणे टीमच्या संजीव गोयंका यांनी अचानक एन्ट्री करत स्टोक्सवर थेट 14.50 कोटींची बोली लावत बाजी मारली. स्टोक्सपाठोपाठ इंग्लंडच्याच टायमल मिल्स याला 12 कोटींचा भाव मिळाला. तर, दक्षिण अफ्रिकेचा वेगवाग गोलंदाज कागिसो रबाडा आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना 5 कोटींचा भाव मिळाला आहे.

तर दुसरीकडे २ कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यावेळी ‘अनसोल्ड’ राहिला. याशिवाय, चेतेश्वर पुजारा, मनोज तिवारी, आर.पी.सिंग या खेळाडूंमध्येही यावेळी कोणीच रस दाखवलेला नाही. तर, भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला या सीजनमध्ये कोणीच वाली मिळालेला नाही. लिलावाच्या सकाळच्या सत्रात आतापर्यंत भारतीय खेळाडूंमध्ये कर्ण शर्मा याच्यावर सर्वाधिक 3.20 कोटींची बोली लागली आहे. तर अनिकेत चौधरीला 2 कोटींचा भाव मिळाला आहे.

आतापर्यंत कोणाला किती भाव?

कागिसो रबाडा - 5 कोटी (दिल्ली डेअरडेविल्स)

ट्रेंट बोल्ट - 5 कोटी (कोलकाता नाइट राइडर्स)

पॅट कमिन्स - 4.5 कोटी (दिल्ली डेअरडेविल्स)

कर्ण शर्मा - 3.20 कोटी (मुंबई इंडियन्स)

एजलो मॅथ्यूस - 2 कोटी (दिल्ली डेअरडेविल्स)

मिशेल जॉन्सन - 2 कोटी (मुंबई इंडियन्स)

कोरे अँडरसन - 1 कोटी (दिल्ली डेअरडेविल्स)

पवन नेगी - 1 कोटी (रॉयल चॅलेजर्स बेंगळुरू)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close