S M L

थोडक्यात बचावलं जेटचं विमान

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 10:35 AM IST

थोडक्यात बचावलं जेटचं विमान

20 फेब्रुवारी : जेट एअरवेजच्या मुंबई लंडन फ्लाईटबाबत ३ दिवसांआधी आणीबाणी निर्माण झाली होती. लंडनला जात असताना जर्मनीवर उडत असताना जेटच्या विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला.जर्मन सरकारनं लगेचच आपली लढाऊ विमान पाठवली आणि ही लढाऊ विमानं जेटच्या विमानाला शोधू लागली.विमान सापडलं आणि काही वेळानं एटीसीशी संपर्कही साधला गेला.

त्यानंतर हे विमान लंडनला सुरक्षितपणे लँड झालं. पण जोपर्यंत विमान बेपत्ता होते, तोपर्यंत कोलोंग विमानतळाच्या एटीसीमध्ये घबराट पसरली होती.गेल्या २ वर्षांत प्रवासी विमानं गायब होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या विमानातले सर्व ३१५ प्रवासी बचावले, असंच म्हणावं लागेल.

पाहूयात नेमकं झालं काय?

-जेट एअरवेजच्या 9W 118 या विमानानं गुरूवारी मुंबईहून उड्डाण केलं

विमानात ३०० प्रवासी आणि १५ कर्मचारी

-जर्मनीच्या कोलोंग शहरावर असताना एटीसीशी संपर्क तुटला

एटीसीच्या लक्षात आल्यावर यंत्रणा कामाला लागली

-विमान शोधण्यासाठी तातडीनं लढाऊ विमानं पाठवण्यात आली

लढाऊ विमानांनी जेटचं विमान स्पॉट केलं

-काही मिनिटांत एटीसीशी संपर्क झाला

-नंतर लंडनच्या हिथ्रो विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close