20 फेब्रुवारी : पाकिस्तानचा स्टार खेळाडू शाहीद अफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.त्यानं टेस्ट आणि वन डेमधून आधीच निवृत्ती जाहीर केली होती.पण तो आता टी २०मध्येही खेळणार नाहीय.
२१ वर्षं अफ्रिदीनं क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.९०च्या दशकात जेव्हा भारत पाकिस्तान सामने अधिक रंगायचे, तेव्हा अफ्रिदी भारतीय बॉलर्सच्या नाकीनऊ आणायचा.भारतीय खेळाडूंशी त्याचे होणारे वादही सर्वश्रुत आहेत.
1996 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना फक्त 37 चेंडूंवर शतक ठोकत शाहीद अफ्रिदीने क्रिकेट चाहत्यांच्या आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतरच ख-या अर्थाने शाहिदीने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. हा त्याचा दुसराच सामना होता. विशेष म्हणजे शाहीद अफ्रिदीच्या या रेकॉर्डला तब्बल 17 वर्ष कोणीच तोडू शकलं नाही.
त्यानं एकूण ३९८ वन डेमध्ये ८ हजार ६४ रन्स बनवलेत आणि ३९५ विकेट्सही घेतल्यात. टी 20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अफ्रिदीने 98 सामने खेळत 1045 धावा केल्या. यावेळी त्याने 97 विकेट्स घेतल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv