S M L

पानसरेंच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण,माॅर्निंग वाॅक करून केला निषेध

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 09:49 AM IST

पानसरेंच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण,माॅर्निंग वाॅक करून केला निषेध

kolhapur 1

संदीप राजगोळकर,20 फेब्रुवारी : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या खुनाचा तपास अद्याप अपूर्णच असून मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूर शहरामधून मॉर्निंग वॉक केला.

सकाळी 8 वाजता कॉ. पानसरेंच्या घरापासून या मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. त्यानंतर घोषणा देत हे सगळे कार्यकर्ते कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात पोहोचले. तिथं पानसरेंच्या स्मृती जागवण्यात आल्या. या मॉर्निंग वॉकमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, कॉ. पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे, सून डॉ. मेधा पानसरे यांच्यासह पुरोगामी संघटनांमधले कार्यकर्ते, अंनिसचे कार्यकर्ते, विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी राज्य सरकारवर आता अवलंबून राहून चालणार नाही रस्त्यावरची लढाई बळकट करायला हवी असं मत प्रा. एऩ. डी. पाटील यांनी आयबीएऩ लोकमतशी बोलताना व्यक्त केली. तर मारेकरी न सापडणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याची प्रतिक्रिया डॉ. मेधा पानसरे यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close