S M L

धोनी युगाची कातरवेळ,विराट युगाची पहाट

Sonali Deshpande | Updated On: Feb 20, 2017 09:30 AM IST

धोनी युगाची कातरवेळ,विराट युगाची पहाट

20 फेब्रुवारी : कॅप्टन म्हणून क्रिकेट जगतात धोनी युगाचा जवळपास शेवट झालाय. कारण पुण्याच्या आयपीएल टीममध्ये आता धोनी फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहे.तर दुसरीकडे विराट कोहली युगाची आणखी भरभराट होताना दिसतेय.

पुणे टीमच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मीथची नियुक्ती करण्यात आलीय. पुणे टीमच्या कॅप्टन्सीवरून धोनीला काढलेलं नाही तर त्याच्या इच्छेनुसारच त्याला खेळाडू ठेवण्यात आल्याचं समजतंय. पण पुणे टीमच्या मालकांनी मात्र स्टीव्ह स्मिथला पसंती दिल्यानंतर धोनी पायऊतार झाल्याचं कळतंय.

तर दुसरीकडे विराट कोहली युगाची आणखी भरभराट होताना दिसतेय. कारण प्युमाचा अॅम्बॅसेडर म्हणून विराटनं जवळपास 110 कोटींचा करार केलाय. हा करार आठ वर्षांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे धावपटू उसेन बोल्ट, फुटबॉलपटू थेअरी हेन्रीसारखा विराटही प्युमाचा जागतिक अम्बॅसेडर असेल. धोनीनं अगोदर टेस्टनंतर वन डे आणि आता आयपीएलचं कॅप्टनपद सोडलंय. भारतीय क्रिकेटसाठी धोनी युग संपत चालल्याचं आणि विराट युग भरात येत असल्याचं दिसतंय.

IPLच्या दहाव्या मोसमासाठीचा लिलाव आज बंगळुरूत होणार आहे.टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ या खेळाडूंसाठी फ्रँचायझी किती बोली लावतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.यंदा भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंसाठी मोठ्या बोली लागलेल्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसंच यंदा 5 अफगाण खेळाडूंचा समावेश हेही आयपीएलच्या लिलावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे.

एक नजर टाकूया कुठला संघ किती पैसे खर्च करणार आहे

IPLच्या दहाव्या मोसमासाठी लिलाव

दिल्ली डेअर डेव्हिल्स - 21.5 कोटी

सनरायझर्स हैदराबाद - 20.9 कोटी

रायझिंग पुणे सुपरजाएंट्स - 19.1 कोटी

गुजरात लायन्स - 14.3 कोटी

किंग्ज इलेव्हन पंजाब - 23.3 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 17.8 कोटी

कोलकाता नाइट रायडर्स - 19.7 कोटी

मुंबई इंडियन्स - 11.5 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close