अशोक चव्हाणांच्या सभेकडेदेखील नाशिककरांची पाठ

अशोक चव्हाणांच्या सभेकडेदेखील नाशिककरांची पाठ

  • Share this:

ashok-chavan-rally-nashik

19 फेब्रुवारी :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या सभेला पुणेकरांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचीच पुनरावृत्ती आज (रविवारी) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंकत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतीत झाली. चव्हाण यांच्या सभेकडे नाशिककरांनी सपशेल पाठ फिरवली आहे.

नाशिकमध्ये वडाळा गावात सह्याद्री हॉस्पिटलसमोर आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र 3 वाजून गेल्यानंतर स्टेजवर नेतेमंडळी दाखल झाली, पण नाशिककरांनी मात्र काहीच पत्ता नव्हता. सभेला निम्याहून अधीक खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. नाशिकमधल्या या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी स्थानिक नेते आणि उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही, आणि अखेर सभा गुंडाळण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.

दरम्यान, काल शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेकडेही पुणेकरांनी अशीच पाठ फिरवली होती. या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्‌विट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 06:30 PM IST

ताज्या बातम्या