प्रचारतोफा थंडावल्या; कोण कौरव, कोण पांडव? आता फैसला जनतेचा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2017 09:01 PM IST

प्रचारतोफा थंडावल्या; कोण कौरव, कोण पांडव? आता फैसला जनतेचा

maha_politics

19 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान एकमेकांना कौरव-पांडव, गुंड, भ्रष्टाचारी अशा शब्दांनी संभावना करताना आपण ऐकलं आहे. आता मात्र या आधुनिक महाभारताचा शेवट झाला असून मंगळवारी 21 तारखेला मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील महानगरपालिक आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला होता. प्रचाराचा अखेरच्या दिवशीही उमेदवारांनी रॅली, पदयात्रांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला. त्यामुळे शहरात आज (रविवारी) दिवसभर धामधुमीचं वातावरण होतं. एकूण प्रचाराच्या रणधुमाळीवरुन आता महापालिकेत सत्ता कोणाची येणार याविषयींच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. गाजर गॅंग, भाजपची राष्ट्रवादी झाली, भाजप निष्ठावंतांवर अन्याय, गुंडांना पक्षप्रवेश इथपासून ते शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती, नेत्यांचे मॅचक्‍सिंग अशा एक न अनेक नव्या मुद्यांवरून सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका केली.

राजकीय आरोपांपासून व्यक्तिगत आरोपांपर्यंत ते एकमेकांची संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान देण्यापर्यंत, सर्व आव्हानं आणि प्रतिआव्हानं देताना मतदार राजाने पाहिलं आहे. आता हे सर्व रामायण, महाभारत झाल्यावर मतदार राजा नेमका काय विचार करतोय, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. राजकीय पक्षांनी कितीही आश्वासनं दिली, आमिशं दाखवली तरीही, मतदार राजा त्याच्या मनात जे असते तेच करतो  असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या 10 महानगरपालिका निवडणुकीत कोण सत्त राखणार आणि कुठे सत्ता परिवर्तण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीचा पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान झालं आहे. या टप्प्यात सुमारे 69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याही टप्प्यात विक्रमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...