'आमचे मत वायकरांना',मतदारांनीच लावले फलक

'आमचे मत वायकरांना',मतदारांनीच लावले फलक

  • Share this:

vaykar

19 फेब्रुवारी : वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार बाबुराव वायकर यांच्या समर्थनासाठी मावळ तालुक्यातील चिखलसे गावात मतदारांनी स्वखर्चाने आपल्या घरासमोर 'आमचे मत वायकरांना'असे फलकच लावले आहेत. या फलकांमुळे बाबुराव वायकरांच्या प्रचाराची चर्चा गटातच नाही तर संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.

वडगाव खडकाळा गटात भाजप आणि रिपाई युती तसेच राष्ट्रवादी, स्वाभिमानी. रिपाई आघाडी अशा दोन प्रमुख पक्षांचं तुल्यबळ असलं तरी वायकर यांच्या अपक्ष भूमिकेमुळे इतर उमेदवारांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 01:25 PM IST

ताज्या बातम्या