प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

  • Share this:

prachar

19 फेब्रुवारी : 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. काल सर्वच नेत्यांच्या मोठ्या सभा झाल्या.त्यामुळे आज रोड शो आणि गाठी भेटी घेण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असून, आज सायंकाळी ५ वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार असून, रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होईल.

दरम्यान मंगळवारी 21 तारखेला हे मतदान होणार आहे. आणि 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी मतमोजणी केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 19, 2017, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading