मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2017 05:32 PM IST

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज

07

19 फेब्रुवारी : मुंबई महानगर पालिकेचं मतदान आता जवळ येऊन ठेपलंय. काऊंट डाऊन सुरू झालंय आणि त्यासाठी एकदम जय्यत तयारी केलीय. कशी आहे तयारी ?

मनपाची जय्यत तयारी

मनपासाठी एकूण मतदार  आहेत ९१ लाख ८० हजार ४९१ आणि एकूण मतदारसंघ  आहेत २२७.  तर एकूण उमेदवार  आहेत २२७५.

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची. त्यासाठी ४२ हजार ७९७ पालिका कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं गेलंय.

Loading...

निवडणुकीत काहीही गुन्हा घडू नये म्हणून शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, विशेष कमांडोज तैनात नेमले गेलेत. पोलिसांची विशेष शाखा आणि गुन्हे शाखेचं बारीक लक्ष अख्ख्या मुंबईवर आहे.

मतदार आणि कर्मचाऱ्यांसाठी ७२४ बेस्ट बसेसचा वापर होणार आहे. आरटीओच्या ३ हजार ४४९ गाड्या आणि २ हजार १०६ टॅक्सी आयोगासाठी दिल्या गेल्यात.

यावेळी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटलीय. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला, याची उत्सुकता आहे. एकूणच ही निवडणूक रंगतदार होणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...