मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी 2 आरोपींना अटक

मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी 2 आरोपींना अटक

  • Share this:

manoj_mhatre3

19 फेब्रुवारी : काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात 2अारोपी नारपोली पोलिसांच्या ताब्यात घेतलेत. मयुर ऊर्फ कोको प्रकाश म्हात्रे, महेश पंडित म्हात्रे अशी त्या आरोपींची नावं आहेत.त्यासंदर्भात

पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत.

मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले.

जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. म्हात्रेंवर हल्ला केल्यानंतर दोन्हीही हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, अखेर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 19, 2017, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading