न्यूयाॅर्कमध्ये 'जय शिवाजी'चा नारा

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2017 10:43 AM IST

न्यूयाॅर्कमध्ये 'जय शिवाजी'चा नारा

SHIVAJI USA

19 फेब्रुवारी : न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.अमेरिकेतल्या छत्रपती फाऊंडेशन गेली तीन वर्ष न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतेय.या उत्सवात महाराष्ट्रातीलच नाही तर अमेरिकेत असलेल्या भारतातल्या इतर राज्यांतले तरूणही मोठ्या संख्येनं सहभागी होतात.

भगवे झेंडे आणि फेटे, महाराजांचा फोटो आणि मराठमोळ्या वेशातल्या या तरूणांनी टाईम्स स्क्वेअरवर सर्वांचं लक्षं वेधून घेतलं.महापुरूषांचे उत्सव साजरा करण्याबरोबरच अमेरिकेत येणाऱ्या मराठी तरूणांना मार्गदर्शन करण्याचं कामही छत्रपती फाऊंडेशन करत असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...