S M L

खबरदारी म्हणून मुंबईत बाराशे जण ताब्यात

Sonali Deshpande | Updated On: Feb 19, 2017 09:46 AM IST

34 mumbai police

19 फेब्रुवारी : येत्या मंगळवारी मुंबईत मतदान होणार आहे आणि त्यासाठी पोलिसांनी १२०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलीय.उपद्रव माजवू शकणाऱ्या एकूण १२०० जणांना ताब्यात घेण्यात आलंय.ज्यांच्यावर आधी खटले आहेत किंवा निवडणुकीच्या वेळेला राडा करण्याचं रेकॉर्ड आहे, अशा लोकांवर ही कारवाई केली गेलीय.

एवढंच नाही तर गेल्या २ दिवसांपासून अनेक संवेदनशील भागांत पोलिसांचा फ्लॅग मार्चही सुरू आहे.भायखळा, नागपाडा, धारावी, चेंबूर, पंतनगर, गोवंडी, कुर्ला, मालवणी आणि बेहरामपाडा या भागांवर पोलिसांनी फ्लॅग मार्च केला.मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी जवळपास सर्व पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 09:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close